• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या बोर्डाचे अनावरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थिती त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या बोर्डाचे अनावरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थिती त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या शाखेचे अनावरण करण्याचे नियोजन राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे राज्याचे पदाधिकारी व्यंकट बिरादार, विभागीय अध्यक्ष  सतीश पवार हर्षद केंद्रे, कार्याध्यक्ष उमेश मोरे यांनी केले होते याप्रसंगी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  शिवाजीराव माने यांना निमंत्रित केलेल होत परंतु सदरील बोर्डाचे अनावरण करण्याचा मान 08 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ. ओमकला चवळे व लातूर आगार कार्याध्यक्ष  शितल वाघमारे यांना मान दिला व दोन्ही महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बोर्डाचे अनावरण झाले .

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने सन्मान आले की हिंदुस्थानातील एकमेव पक्ष आहे यामध्ये जात-पात पहिली जात नाही एवढेच नाही तर स्त्री-पुरुष हा सुद्धा भेदभाव नाही शिवसेनेमध्ये महिलाला सन्मान आणि वागणूक दिली जाते ताई संस्कृतीचे जतन केलं जातं बहीण भावाच्या नात्याप्रमाणे महिला आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिक काम करतात शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ही शिकवण शिवसेनेचे मुख्य नेते सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी दिलेला कानमंत्र महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक पाळतो आहे छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर शिवसेना चालते म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते एकनाथराव शिंदे यांचा  बोल बाला संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे राष्ट्रीय कर्मचारी सेना असेल वाहतूक सेना असेल शेतकरी सेना असेल युवा सेना असेल महिला आघाडी असेल या सर्वांची मोट बांधून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचे ध्येय राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी उराशी बाळगलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी विविध अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा व एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले याप्रसंगी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, विभागीय कोषाध्यक्ष शरद पवार, संघटक सचिव प्रदीप गुरव ,निलंगा आगार अध्यक्ष संतोष बिंगोले, निलंगा सचिव विष्णू नाईकवाडे ,औसा अध्यक्ष सचिन हवलदार, विभागीय कार्यालय अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, विधी सल्लागार श्री आबासाहेब शिंदे ,लातूर विभाग उपाध्यक्ष गांजकर, लातूर अध्यक्ष मारुती चाटे, सचिव भीमाशंकर पाटील, आगार संघटक सचिव नामदेव फड, लातूर उपाध्यक्ष नागरगोजे धनंजय डोंगरे,  निळेकर, हसूरीकर असे अनेक राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी शिवसेनेक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने