• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

परचंडा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरात कराड परिवाराकडून नवसपुर्ती.

परचंडा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरात कराड परिवाराकडून नवसपुर्ती
 लातूर दि. ०८ -  भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड आमदार  व्हावेत यासाठी अहमदपूर तालुक्यातील मौजे परचंडा येथील श्री रोकडोबा हनुमान या देवस्थानाकडे अ‍ॅड. गोपाल मदनलाल काबरा यांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड आणि कराड परिवाराच्या वतीने ८ मार्च शनिवार रोजी परचंडा येथे श्री रोकडोबांची महापूजा केली. 
         असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहमदपूर तालुक्यातील मौजे परचंडा येथील श्री रोकडोबा हनुमान देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर परिचित आहे. भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड यांच्यावर प्रेम करणारे परचंडा येथे तब्बल १५ वर्ष सरपंच म्हणून कार्य केलेले अ‍ॅड. गोपाल मदनलाल काबरा यांनी या देवस्थानाकडे लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून रमेशआप्पा विजयी होऊन आमदार व्हावेत असा नवस निवडणुकी दरम्यान केला होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन रमेशआप्पा विजयी झाल्याचे घोषित झाले असता आपली इच्छा रोकडोबांनी पूर्ण केली या भावनेतून काबरा यांना प्रचंड आनंद झाला 
  आप्पांच्या विजयाची नवसपुर्ती करण्यासाठी कराड परिवारानी श्री रोकडोबा देवस्थानात अभिषेक, महापूजा करावी ही काबरांची इच्छा होती त्यानुसार शनिवार ८ मार्च रोजी भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी परचंड येथे जाऊन श्रीक्षेत्र रोकडोबाचा अभिषेक केला, महापूजा व आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कराड परिवारातील आमदार रमेशआप्पा कराड यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनीताई कराड, भाजपाचे नेते राजेश कराड, सौ शुभांगीताई राजेश कराड त्याचबरोबर सीए अ‍ॅड. गोपाल मदनलाल काबरा, पत्नी सौ. गंगादेवी गोपाल काबरा, मुलगा सीए अमोल काबरा आणि सीए सौ. नेहा काबरा व इतर अनेक जण होते.
         याप्रसंगी अ‍ॅड. गोपाल काबरा यांनी राजेश कराड आणि ऋषिकेश कराड यांचा तर सौ. गंगादेवी काबरा यांनी सौ. संजीवनीताई कराड सौ. शुभांगीताई कराड यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते त्रिंबकआबा गुट्टे, अ‍ॅड. भारत चामे, परचंडा येथील सरपंच शिवकुमार हिप्परगे, बालाजी मुंडे, गणेश मुंडे, भारत शेळके, शिवा शेळके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने