लातूरसाठी नवीन प्रशासकीय इमारत व नियोजन भवन संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट !
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मुंबई येथील लोहगड निवासस्थानी भेट घेत लातूरच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने लातूर मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे येथे जुन्या इमारती पाडून नवीन त्याठिकाणी सद्यस्थितीत खासगी इमारतीमध्ये भाडेतत्वावर असलेल्या विविध ४७ शासकीय कार्यालयांकरिता एकत्रित प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय इमारत व नियोजन भवन इमारत बांधकाम करण्यासाठीचा रीतसर प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांनी महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांना यापूर्वीच सादर केला आहे.
तरी मा.मंत्री महोदयांनी या नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारत बांधकामासाठी निधी लवकर उपलब्ध करून देण्यासंबंधीचे पत्र देऊन त्यांच्याशी या विषयी सखोल चर्चा केली. मा मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक विचार करून लवकरच निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले.
Tags
The महाराष्ट्र News