लातूरकरांच्या आरोग्यासाठी भाजपचे मनपा आयुक्त व आमदाराच्या विरोधात केले जलाभिषेक आंदोलन..
नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात..
लातूर : लातूर शहरात नळाद्वारे अशुद्ध, गढूळ पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. त्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी आज 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता भाजप लातूर शहरच्या वतीने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात लातूर शहर महानगर पालिकेवर मोर्चा काढून मनपाच्या पायऱ्यावर आ.अमित देशमुख व मनपा प्रशासनाचा दूषित पाण्याने जलाभिषेक करून निषेध केला.
या वेळी लातूर मनपा व स्थानिक आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पाणी पुरवठा अभ्यंता चैव्हाण यांना निवेदन देण्यात येऊन लातूर शहरला तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी दिला आहे.
या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे, ऍड. प्रदीप मोरे, माजी नगरसेवक रवी सुडे, प्रा. उदय देशपांडे, आबा चौगुले, निखिल गायकवाड, संजय गीर, ऍड. विजय अवचारे, अतिश कांबळे, गणेश कसबे, राहुल भूतडा, सुरेश जाधव, अजय भूमकर, गोपाळ वांगे, अनिल पतंगे, सुरेश राठोड,संतोष तिवारी, पंडुरंग बोडके, लखन कावळे, सचिन पांचाळ, योगेश घोरपडे, अरुण ढवळे, गोविंद सूर्यवंशी,रोहित माने, सचिन जाधव आदिसह लातूर शहर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
Tags
The महाराष्ट्र News