लातूर साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 90.00%च्या पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा कालिदासजी माने सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लातूर:- अवंती नगर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, लातूर या शाळेचा इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा मार्च-2025 चा निकाल 99.00% लागला असून शाळेतून सर्वप्रथम यादव गारगी विनय 97.00%, द्वितीय कदम विद्या रघुनाथ 96.00% तर तृतीय लगड कुणाल रतन 95.00% तसेच मोरे आर्यन गोविंद 93.60%, अन्नमवाड प्रेरणा विरभद्र 93.40%, पवार गौरव बालाजी 93.20%, गुरमे वैष्णवी हरिराम 92.20%, ढास समाधान बंडू 92.00%, बिडवे जान्हवी ज्ञानेश्वर 92.00%, तिगिले दत्तप्रसाद पांडुरंग 91.80%, राऊत भाग्यश्री अशोक 91.80%, भंडारी रजत जयप्रकाश 91.60%, काजळे साक्षी अंतेश्वर 91.40%, मुंडे सुशांत नवनाथ 90.60%, पाटील रुपेश विजय 90.00%, जमादार सोनाली प्रकाश 90.00%, फेरे श्रेयश नवनाथ 90.00%, असे अनुक्रमे टक्के वारी घेऊन यश मिळविलेले आहे.

या यशाबद्दल आज त्यांचा शाळेमध्ये बोलावून संस्थेचे सचिव मा. कालिदासजी माने सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, पालक प्रतिनिधी म्हणून प्रमोदजी टेकले सर, ज्ञानसागर वसतिगृहाचे संचालक गोपाळ शिंदे, 10 वी या वर्गाचे वर्गशिक्षक गणेश परळे, दयानंद लहाडे, मिनाक्षी यादव, पौर्णिमा बनसोडे, कोमल डोनगावे आदी शिक्षक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.