भारत मातेचे शूर वीर जवानांनी त्याग बलिदान समर्पणाची भावना घेऊन देश सुरक्षित ठेवल्याबद्दल नमन करतो :-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
लातूर दिनांक 19 मे 2025 रोजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
आज औसा शहरांमध्ये तिरंगा रॅली घेण्यात आली यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून औसा शहरातील ग्रामीण भागातील माजी सैनिक सैनिक सीमेवर असणाऱ्या सैनिकांचे माता पिता वीरमाता यांचा शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ फेटा हार घालून सत्कार करण्यात आला. यामध्ये
ऑरनरी कॅप्टन कमलाकर सूर्यवंशी, माधव मोहिते, हनुमंत मतगर, टीके पुंडलिक, ढगे मधगर , विसापूर भारत, माळी गणपती, ज्ञानोबा मोरे, माणिक फुटाणे, प्रकाश कोळी, दगडू माळी ,शशिकांत सूर्यवंशी, राम शिंदे, कालिदास माळी, विशाल जाधव, गणपती माळी ,ज्ञानोबा मोरे, माणिक फुटाणे, प्रकाश कोळी, दगडू माळी ,शशिकांत सूर्यवंशी, राम शिंदे, कालिदास माळी, विश्वनाथ पाटील, टीके पांडुरंग ,शिंदे श्रीमंत, माने एसएल, पवार अंगद, ससाने भीमाशंकर ,पांडुरंग मुंजाळ, अशोक कदम, बळीराम बोडके, माने मोहन, परमेश्वर सूर्यवंशी ,शोभाताई माळी, चंद्रकलाताई भोसले ,रमेश सूर्यवंशी ,कलोरे पितांबर, राजेंद्र सोमवंशी ,रामचंद्र लोखंडे असे असंख्य माजी सैनिक उपस्थित होते.
वरील सर्व माजी सैनिक सेवारत सैनिक सैनिकांचे माता पिता यांचा सत्कार शाल श्रीफळ फेटा व हार घालून करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिकाचे प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन कमलाकर सूर्यवंशी साहेब म्हणाले की आज आम्ही धन्य झालो. देशाच्या संरक्षणासाठी लेकरं बाळ सोडून कुटुंबाची परवा न करता देशाचे संरक्षण हेच आमचे ध्येय ठेवून आम्ही सीमेवर लढलो. परंतु आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब तुम्ही आमचा केलेला सत्कार दिलेला सन्मान ही आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. होय आज पर्यंत असा सन्मान असा सत्कार आमचा कुणीही केलेला नव्हता त्याबद्दल मी आमच्या संघटनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब व आपले आभार मानतो.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी आम्हा तमाम पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना तिरंगा रॅली काढून भारताच्या सीमेवर लढलेल्या सर्व सैनिकांचे लढत असलेल्या सैनिकांचे सैनिकांच्या मातापित्यांचे वीर माता वीर पत्नीचे आभार मानून त्यांना शौर्य गाजवण्यासाठी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी गावोगाव जाऊन धन्यवाद माना असा आदेशच दिलेला आहे. त्या अनुषंगाने आज तिरंगा रॅलीच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्व माजी सैनिक सैनिक सैनिकांचे माता पिता वीरमाता यांना मी साष्टांग दंडवत घालून तुमचे लाख लाख आभार मानतो कारण या भारतावर आत्तापर्यंत मोठे चार आक्रमण पाकड्याकडून झालेले आहेत 1965 ,1971 ,1999, आणि 2025 व तसेच छोट्या-मोठ्या अनेक कुरापती झाल्या मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला परंतु या पाकड्याचे मनसुबे तुम्ही सर्व जवानांनी उलथवून टाकले एवढेच काय काल पहलगाम मध्ये 26 निष्पाप पर्यटक नागरिकांना या पाकड्यांनी धर्म विचारून मारले. याचा बदला घेण्यासाठी भारताच्या सैन्य दलाने सैनिकाने अवघ्या 23 मिनिटाच्या आत 90 अतिरेक्याची स्थळ उध्वस्त करून शेकडो अतिरेकी ठार मारले .आणि मग पाकिस्तान उसने अवसनावर भारतासोबत युद्धाची भाषा करू लागला. फुसकी ड्रोन पाकिस्तान भारतावर पाठवून चीनच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस आपल्या जवानांनी या पाकड्यांना चोख प्रतिउत्तर देऊन त्यांचे ड्रोन मिसाईल निस्तनाबूत केले. एवढेच नाही कराची, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी इथपर्यंत आपल्या सैनिकांनी मारा करून पाकिस्तानचे कंबरड मोडलं आत्तापर्यंतचे झालेले सर्व युद्ध सैनिकांनी लढलेल्या बळावर आपण जिंकली आहेत. परंतु ताश्कंद आणि शिमला करार यामध्ये आपण राजनैतिक हरलो. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे आजच सरकार सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असून सैनिकांना पूर्ण मुभा दिलेली आहे. आज जरी तात्पुरती शस्त्र संधी झालेली असली पूर्ण युद्ध थांबलेलं नाही मला शंभर टक्के खात्री आहे यदाकदाचित पाकिस्तानने पुन्हा आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट होईल आणि भारताचा तिरंगा इस्लामाबाद लाहोर कराची वर अडकलेला दिसेल .हे सगळं तुमच्या त्यागाने तुमच्या बलिदानामुळे तुमच्या समर्पित भावनेने शक्य होणार आहे. म्हणून मी शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीने तुम्हा सर्वांना नतमस्तक होऊन या तिरंगा रॅलीच्या कार्यक्रमांमध्ये आपण येऊन आमचा छोटासा सन्मान स्वीकारला याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे शहर प्रमुख बंडू कोद्रे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी शिवसेनेचे शिव सहकार सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष मनोज पवार जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील तसेच दाजी जाधव उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील तालुकाप्रमुख विकास शिंदे भगवान जाधव धनराज बिराजदार शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख उपतालुका प्रमुख सहदेव भाऊ कोळपे बाळासाहेब कांबळे धनंजय हंबीरे गोविंद धानोरे किरण नारायणकर वेंकट पवार भागवत कुंभार ज्ञानेश्वर कांबळे सोहेल तांबोळी बाळू जाधव महेश देशपांडे देवराव मोहिते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
Tags
The महाराष्ट्र News