महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या धाडसाची कार्याची कर्तुत्वाची दखल घेऊन औसा तालुक्यातील किल्लारी येथील युवकांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किल्लारी येथील उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कार्याची कर्तुत्वाची धाडसाची दखल घेऊन आज शिवसेनेमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते छावा संघटनेचे तालुकाप्रमुख राहुल सावंत यांच्यासह किल्लारी शहरातील उ बा ठा गटातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुखअसलेले,
राहुल राजेंद्र सावंत, दत्ता अभिमन्यू बिके पवन रणजीत सिंह राजपूत अमर बालाजी राजपूत, राजेंद्र सुरेश भोसले, प्रभाकर एकनाथ बनसोडे शरणाप्पा विश्वनाथ कुंभार, शिवाजी गणपती चव्हाण, रुपेश रमेश बोधणे , चैतन्य भारत शिंद, यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.व येत्या काही दिवसात किल्लारी, मातोळा, लामजना गटातील ऊ बा ठा व इतर पक्षातील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवाजीराव माने साहेब म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून बऱ्याच पक्षातील असंख्य लोकांनी माजी आमदार माजी खासदार प्रमुख काही पदाधिकारी इतर पक्षातून शिवसेनेत प्रवेश घेत आहे अत्यंत विश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबद्दल एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यामुळे तयार झालेला असून लोकांचा लोंढा खूप मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांकडे आहे होय यामध्ये लातूर सुद्धा मागे नाहीये आणखीन बऱ्याचसे प्रवेश होणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आलेल्या सर्व युवकांना पदाधिकाऱ्यांना लातूर जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये सन्मानपूर्वक वागणूक देईन तसेच तुमच्या कार्याची दखल घेऊन संघटनेतील पदावर सन्मानपूर्वक काम करण्याची सुवर्ण संधी दिली जाईल मला निश्चित खात्री आहे एकनाथराव शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण निश्चितच शिवसेना वाढवण्यासाठी कार्य कराल हे करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही ती अडचण सोडवण्यासाठी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी तुमच्यासोबत सदैव तत्पर आहे असा विश्वास शिवाजीराव माने साहेब यांनी प्रवेश करणाऱ्या लोकांना आज दिला याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजीराव सुरवसे यांनी प्रवेश केलेल्या सर्व लोकांचे स्वागत केले अभिनंदन केले व प्रास्ताविकामध्ये किल्लारी विभागात आपल्याला गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करायचा आहे शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी जनता शेतकरी यांच्या अडीअडचणी आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून सोडवायचे आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपल्यालाप्रयत्न करायचे आहे येणाऱ्या निवडणुका ह्या तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत यामध्ये जनतेचा विश्वास संपादन केला व लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या तर नक्कीच आपण ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सभागृहामध्ये आपल्याला लोक निवडून देतील आपले शिवसेनेचे पदाधिकारी त्या त्या सभागृहामध्ये प्रतिनिधी असतील अध्यक्ष असतीलआणि त्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करू तालुक्यामध्ये शिवसेने ची पाळेमुळे रोवून औसा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला बनवून औसा तालुक्याच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकवून पुढे येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरील आमदार निवडून विधानसभेवर भगवा फडकवू औसा तालुक्यामध्ये आपणा सर्वांना सोबत घेऊन शिवसेना वाढीसाठी कार्य करून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचा व त्यांच्या कार्याचा सतत प्रचार आणि प्रसार करत राहील असा विश्वास या वेळी दिला.
Tags
The महाराष्ट्र News