सौ कीर्ती सुवर्णकार यांचे एरोबिक्स झुंबा लेडीज फिटनेस चा वर्षपूर्ती सोहळा संपन्न.
लातूर प्रतिनिधी :कीर्ती सुवर्णकार यांनी एक वर्षांपूर्वी एरोबिक्स झुंबा लेडीज फिटनेस या नावाने महिलांच्या आरोग्यासाठी हे फिटनेस सेंटर उघडले.
आणि आज यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरामध्ये अनेक महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर झाल्याचे महिलांनी सांगितले. ही सुद्धा एक समाजसेवाच आहे आणि या कामाबद्दल कीर्ती यांचे मनापासून कौतुक..
आज वर्षपूर्तीनिमित्त मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले त्याबद्दल मनापासून आभार.
त्यांना विचारले की आपण वर्षपूर्तीनिमित्त मलाच का प्रमुख अतिथी म्हणून बोलावले, तर त्यांनी अतिशय चांगला विचार माझ्यासमोर मांडला की ज्या काही गृहिणी आहेत त्यांना सुद्धा तुमच्याकडे बघून काहीतरी करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही ....
असं प्रमुख पाहुण्या प्रीतम जाधव यांनी हा समाजसेवेचा हाती घेतलेला वसा असाच उत्तरोत्तर वाढावा याच शुभेच्छा या वेळी दिल्या.
आणि लातूर नागरील सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी, आरोग्य सांभाळण्या साठी किर्ती झुंबा सेंटर ला अवश्य भेट द्या आणि आपल्या आरोग्यासाठी काय योग्य आहे झुंबा केल्याने काय बदल होतात हे जाणून घेण्याचं आवहान केले.
Tags
The महाराष्ट्र News