डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रयत्नाना यश....
बडूर गावचे रहिवासी असलेल्या कै गुरुलिंग हासुरे गुरुजींचा काही दिवसापूर्वी निर्घुण खून करण्यात आला होता त्या मधील आरोपी फरार होते त्यांना तात्काळ अटक करावी आणि हासुरे कुटुंबीय व गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी घेऊन सर्व गावकरी उपोषण साठी बसले होते याठिकाणी भाजपा नेत्या डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भेट देऊन शब्द दिला की लवकरात लवकर सगळे आरोपी अटक होतील त्यासाठी मी प्रयत्न करेन अन् त्यांनी दिलेल्या शब्द प्रमाणे आज पोलिसांनी कारवाई केली आहे
दि. 26 एप्रिल रोजी औंढा ता. निलंगा येथील जमावाने केलेल्या मारहाणीत बडूर येथील शिक्षक गुरुलिंग हासूरे यांची दुर्दैवी हत्या झाली होती.हा हत्या प्रकरणतील सर्व आरोपीना अटक व्हावी व हासूरे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी बडूर ग्रामस्थांनी दि. 2 मे पासून गावात साखळी उपोषण सुरुवात केले होते. दि. 8 मे रोजी डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या व हासूरे कुटुंबाच्या भावना जाणून घेतल्या.गावात भेट दिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत या घटनेची सर्व माहिती त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना दिली तसेच याचं संदर्भात नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासोबत बोलून सदरील घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले असता त्यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात राहिलेल्या दोन आरोपीना शोधून परराज्यातून अटक केली. बडूर ग्रामस्थांच्या मागण्यापैकी पहिली मागणी या घटनेतील सर्व आरोपीना अटक झाली म्हणून सर्व ग्रामस्थांनी डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे शतशः आभार मानले आहेत तसेच पोलिस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप सर व सर्व पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत
Tags
The महाराष्ट्र News