लातूर : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक
संघटनेच्यावतीने दरवर्षी योग्यता प्रमाणपत्राचे
नूतनीकरण केले जाते. पण त्याचबरोबर फिटनेस
पासिंग व ७ प्लस १ स्कूलबस परमिट मिळावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकसेनेच्या वतीने राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहे.
स्कूलबस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या
अडी-अडचणी काय आहेत, याबाबत परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मुंबई
येथे बैठक पार पडली. यावेळी शालेय विद्यार्थी
वाहतूक सुरक्षा संदर्भात चर्चा झाली. प्रमाणपत्र
नूतनीकरण प्रसंगी फिटनेस अपॉईंटमेंट घेण्यासाठी
एसएलडी १६ एसा मॅसेज येत असल्याने फिटनेस
अपॉईंटमेंट भेटत नाही. शिवाय स्कूलबसमध्ये ७
प्लस १ अशाप्रकारे नवीन परमिट मिळावे,
मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटनेचे
अध्यक्ष माधव कुलकर्णी, संस्थापक सचिव मारुती
सावंत, जिल्हाध्यक्ष साहेबराव साळुंके, संस्थापक
सदस्य सचिन निलामे, कृष्णा साळुंके व विद्यार्थी
पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News