• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

माईर्स एमआयटी तर्फे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित‘सुवर्णपिंपळ’ महानाट्याचे आयोजन ६ मे रोजीविश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे आयोजनः सर्वांसाठी मोफत

दिः ५ मे २०२५
माईर्स एमआयटी तर्फे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित
‘सुवर्णपिंपळ’ महानाट्याचे आयोजन ६ मे रोजी
विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रूई येथे आयोजनः सर्वांसाठी मोफत

लातूर, दि.५ मे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्री गोपाळबुवा महाराज विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून ‘सुवर्णपिंपळ’ हे महानाट्य ६ मे रोजी सायंकाळी ७ वा. विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
अत्यंत प्रतिभावना व संवेदनशील द्रष्टे लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे लिखित दिव्य ज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार असलेले थोर योगी तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या भक्ती, त्याग, समर्पण संघर्ष आणि करूणामय जीवनावर आधारित हे महानाट्य आहे. माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभाशीर्वाद व प्रमुख मार्गदर्शनात याचे आयोजन करण्यात येत आहे.
या वेळी संतवृत्तीचे जागतिक कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प बापूसाहेब मोरे अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. रतनलाल सोनग्रा हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील.
तसेच माईर्स एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस, ज्येष्ठ कवी, लेखक व वक्ते डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व माईर्स एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ. मिलिंद पांडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘सुवर्णपिंपळ’ हे महानाट्य सर्वांसाठी मोफत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थ व नागरिकांनी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने