भारताच्या जबरदस्त दणक्यामुळे पाकिस्तान कटोरा घेऊन जगभर भीक मागत फिरत आहे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
दिनांक 20 मे 2025 रोजी लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा रॅली निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ या गावांमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते गावातील सीमेवर सेवारत जवान ,माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता ,सीमेवर सध्या लढत असलेल्या जवानाचे माता पिता यांचा शाल, श्रीफळ, फेटा, हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी गुऱ्हाळ या गावातील विद्यार्थी, माता भगिनी ,तरुण वर्ग ,यांनी 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रत्येकाच्या हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत रॅलीला सुरुवात केली. गावातून रॅली गावच्या ग्रामदैवतापर्यंत आली .अत्यंत उत्साही वातावरणात जसे आपण राष्ट्रीय सण साजरे करतो 15 ऑगस्ट ,26 जानेवारी ,त्याच पद्धतीचे वातावरण संपूर्ण गावात तयार झालेलं होतं .शिवसेनेच्या तिरंगा रॅलीचे अत्यंत जोरदार पद्धतीने स्वागत गावकऱ्यांनी सुद्धा केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज मी संपूर्ण जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करून भारत मातेच्या सीमेवर प्रसंगी प्राणाची आहोती देऊन या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जवानाप्रती सन्मानाची भावना घेऊन माझ्या संपूर्ण पदाधिकारी आणि टीम सहित आलो आहे. पाकिस्तान कारण नसताना भारताला छेडलं स्वतःचं कंबरड मोडून घेतलं सगळ्या जगात अशी फजिती झाली. आपल्या जबरदस्त सैन्य दलांना सैनिकाने असा जबरदस्त प्रहार केला की पाकिस्तानचे पंतप्रधानापासून सैन्याच्या जनरल पर्यंत सगळ्यांनीच बंकर मध्ये लपून बसण्याची वेळ आली. लाहोर, कराची ,इस्लामाबाद, रावळपिंडी टप्प्यात आल्याबरोबर मिसाइलचा जबरदस्त मार खाल्ल्याबरोबर अख्या जगभर विनंती करून भारतासमोर गुडघे टेकले. झालं गेलं माफ करा यापुढे असं होणार नाही .हे युद्ध थांबवा परंतु आपल्या सरकारने सैनिकांनी युद्ध थांबवलेलं नसून वेट अँड वॉच भूमिका घेऊन सदैव तत्पर आहेत. तात्पुरती स्थगिती आहे. यापुढे एकही चूक पाकिस्तान न केली तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तान गायब होईल इतका जबरदस्त प्रहार भारताकडून पाकिस्तानवर होईल यात कसले प्रकारची शंका नाही .यापूर्वीचे 1965, 1971 ,1999 ची युद्ध आपण जिंकलोच होतो .25 चे युद्ध तर चारच दिवसात पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं हे सगळं घडलं ते आमच्या सैन्य दलाच्या सैनिकाच्या जबरदस्त कामगिरीमुळे आणि म्हणून आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे यांनी अशा सर्व सैनिकांचा त्या सैनिकांच्या माता-पित्यांचा माजी सैनिकांचा सत्कार करून आम्ही आपल्या सोबत आहोत हे सिद्ध करा माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा असा आदेश दिला असल्यामुळे आम्ही आपले ऋण फेडू शकत नाही परंतु फेडण्याचा प्रयत्न करू आणि आजही पाकिस्तानच्या समोर भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असलेला माझा जवान त्या जवानांच्या प्रति आपली भावना पोहोचवण्यासाठी आम्ही आज आपल्या गावामध्ये आलेलो आहोत. या गावातील सर्व माजी सैनिक सध्या सेवेत असणारे सैनिक जे सैनिक सीमेवर आज लढतात त्यांचे आई-वडील ,वीर माता ,वीर पत्नी, आपण सर्वजणाला आमच्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाचा आपण स्वीकार केलात आपला सन्मान स्वीकारला याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो .असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी काढले.
याप्रसंगी गुऱ्हाळ या गावातील गहिनीनाथ माशाळ ,गोविंद चांदुरे ,आनंदराव भोसले ,उद्धव वाडीकर, कमलाकर मैत्री, शिवराज चौधरी ,बालाजी घायाळ, काशिनाथ रुपनर ,शिवाजी मोरे ,दयानंद मासाळ, नारायण विठू बोने, तसेच वीर माता रुक्मिणीबाई रुपनर, काशीबाई भोसले ,जनाबाई माने अनेक माजी सैनिक उपस्थित होते याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील, तालुकाप्रमुख भगवान जाधव ,औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, शिरूर तालुका प्रमुख विकास शिंदे ,निलंगा शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख, किल्लारी विभाग प्रमुख राहुल सावंत, असे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आभार या तालुक्याचे तालुकाप्रमुख श्रीमान भगवान जाधव यांनी केले.
Tags
The महाराष्ट्र News