• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूरच्या आनद लॉजवर वेश्या व्यवसायपरराज्यातील दोघींची सुटका; १० जणांवर गुन्हा दाखल

लातूरच्या आनद लॉजवर वेश्या व्यवसाय
परराज्यातील दोघींची सुटका; १० जणांवर गुन्हा दाखल
लातूर: लातूर येथील स्क्रैप शिवाजी रोड भागात असलेल्या आनंद लॉजवर अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने (AHTU) धाड टाकून परराज्यातील दोन महिलांची सुटका करून १० जणांवर गुन्हा दाखल केला. पैकी ७ जणांना अटक करण्यात आली असून तिघेजन फरार आहेत. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रैप मार्केट जवळ असलेल्या आनंद लॉजवर AHTU शाखेने छापा टाकून २ महिलेची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या १० आरोपीं विरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रैप मार्केट जवळील आनंद लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात

असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सदर बाबत कडक कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कडून सक्त आदेश पारित झाले होते.

त्याअनुषंगाने आनंद लॉज चा मालक, मॅनेजर व त्यांचे साथीदार परराज्यातील महिलांना लॉज वर आणून वेश्यागमनासाठी एजंट करवी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत अशी गुप्त माहिती प्राप्त होती. मिळालेल्या माहितीची खातरजाम करून त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने काल मंगळवार दि. २० मे २०२५ रोजी १ वाजण्याच्या सुमारास आनंद लॉज, शिवाजी रोड, स्क्रॅप मार्केट, लातूर येथे बनावट ग्राहक वेश्यागमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून

आनंद लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर राज्यातून आलेल्या दोन महिला मिळून आल्या तर लॉज मॅनेजर व इतर साथीदार अशा ७ जणांना लॉज वरून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या २ महिलांची सुटका करण्यात आली तर आनंद लॉजचा चालक, मालक व ईतर सहकारी अशा १० जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये किशोर नरहरी तळेकर, श्याम किशोर तळेकर, शाहु तळेकर रा. म्हाडा कॉलनी, लातूर हे तिघे फरार झाले असून अमोल अंकुश काळुंके (वय २०), संतोष किशोर तळेकर (वय ३०) दोघेही रा. म्हाडा कॉलनी लातूर, अजय तात्याराव कांबळे

(वय ४०) रा.उटगे नगर लातूर, सौरभ अंबादास बिराजदार (वय २५) रा. जिजामाता नगर ता. तुळजापूर जि. धाराशिव, समर्थ नितीन भोसले (वय २१), समर्थ धन्यकुमार कवडे (वय २२), विश्वजीत मोहन शिंदे (वय १९) तिघेही रा. शुक्रवार पेठ ता. तुळजापूर जि. धाराशिव आदींचा समावेश आहे. १० जणांपैकी ३ आरोपी फरार असून वरीलपैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर यांचे मार्गदर्शनात, AHTU पथकाचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, श्यामल देशमुख, पोलीस अंमलदार राजाभाऊ सूर्यवंशी, सदानंद योगी, सुधामती वंगे-यादव, लता गिरी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने