• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

आमदार अमित देशमूख यांनी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या जिल्हा आणि मनपा प्रशासनास केल्या सूचना

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील खाडगाव रोड परिसर  खडक हनुमान मंदिर परिसराची केली पाहणी 

लातूर (प्रतिनिधी):
मंगळवार दि २७ मे रोजी दुपारनंतर लातूर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे  शहराच्या सखल भागात पाणी साचले आहे, रस्त्यावरून  मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, कांही घरात पाणी घुसले आहे. यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर लगेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी,  सहकार्यांसह खाडगाव रोड परिसर तसेच, गावभागातील खडक हनुमान परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली, नागरिकांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.

लातूर शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ठिकाणाहून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन  यंत्रणेला  नागरिकांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. . झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आवश्यक ती मदत करण्यासही सांगितले आहे, आवश्यकतेनुसार काही भागात तातडीची मदत पोहोचवण्याच्या सूचनाही  त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
 *पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन* 
लातूर शहरातील सर्व माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बूथ प्रमुख या सर्वांनीही, आपापल्या परिसरात नागरिकांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घ्यावयाचा आहे. , लहान मुले, महिला व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत असे आवाहन ही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. 

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रभाग प्रभाग १४ मध्ये गेल्यानंतर खाडगाव रोड परिसरातील राजू काळुंखे व योगेश्वरी उद्धव पाटोळे त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या घरामध्ये नाल्याचे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे तसेच प्रभाग क्रमांक एक मधील खडक हनुमान मंदिर परिसरातही नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे,लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास केंद्रे,आपतकालीन नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, लातूर शहर  चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी नगरसेवक रविशंकर जाधव,माजी नगरसेवक आयुब मनियार, माजी नगरसेवक पप्पू देशमुख, प्रभाग क्रमांक १३ चे काँग्रेस पक्षाचे प्रभाग अध्यक्ष ऍड.विजय गायकवाड,पिंटू साळुंखे,विष्णुदास धायगुडे,अभिषेक पतंगे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी नागरिक उपस्थित होते.
------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने