• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन



लातूर दि. २७ – भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशअप्पा कराड यांच्‍या जन्मदिनानिमित्‍त शुक्रवार ३० मे २०२५ रोजी लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावत ग्रामदेवतांना महाअभिषेक, महिला भजनी मंडळींना साडीचोळीचे वाटप, रक्‍तदान शिबीर, पावसाळी छत्रीचे वाटप, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन आमदार रमेशआप्पा कराड मित्र मंडळाच्या वतीने करण्‍यात आले आहे.
          आध्यात्मीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, शेतकरी शेतमजूरासह गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत संघर्ष, गरजुंना वेळोवेळी मदत, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान, हजारो कुटूंबांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिलासा देणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील बहाद्दर मतदारांनी नवा इतिहास घडवून विधानसभेत पाठवले आज सर्व सामान्यांत सतत मिसळणारा आपल्या हक्काचा आमदार निवडून आणला यामुळे यावर्षीचा आ. रमेशअप्पा कराड यांच्या ३० मे २०२५ रोजीच्या जन्मदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 
मतदार संघातील गावागावात वाडी वस्ती          आ. रमेशआप्पा कराड यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य प्रमाणात विधायक उपक्रमातून साजरा व्हावा यासाठी आ. रमेशइअप्पा कराड मित्र मंडळाच्या वतीने अत्यंत सुरेख नियोजन करण्यात आले आहे.
          दि. ३० मे २०२५ रोजी लातूर ग्रामीण मतदार संघातील पानगाव, खरोळा, मुरुड, शिवली, भादा, मसला, चिकलठाणा, सारसा, गोविंदनगर, दर्जीबोरगाव, शेरा, निवळी, चिंचोली बल्लाळनाथ यासह विविध गावागावातील वाडीवस्तीतील ग्रामदेवतांची विधीवत महापुजा करून आ. रमेशअप्‍पा कराड साहेब यांना दिर्घ आयुष्‍य लाभो यासाठी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रार्थना करणार आहेत. तर असंख्‍य भाविकांचे श्रध्‍दास्‍थान असलेल्‍या रेणापूर येथील ग्रामदेवता आदिशक्‍ती श्री. रेणूकादेवी मंदिरात सकाळी ९ वाजता भाजपा नेते         
 आ. रमेशअप्‍पा कराड साहेब यांच्‍या शुभहस्‍ते अभिषेक आणि आरती करण्‍यात येणार आहे.
 लातूर ग्रामीणचे आमदार भाजपा नेते श्री रमेशअप्‍पा कराड साहेब यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त वाढदिवस संयोजन समितीच्‍या वतीने लातूर येथील अंबाजोगाई रोड वरील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील मुख्य इमारतीत असलेल्या डोममध्ये सकाळी ११ वा. अभिष्‍ठचिंतन सोहळा आणि मतदार संघातील २०० महिला भजनी मंडळातील प्रत्येक मंडळास २० याप्रमाणे महिलांना साडी चोळी वाटपाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सोहळयाला भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आ. रमेशआप्पा कराड मित्र मंडळ आणि वाढदिवस संयोजन समितीच्‍या वतीने करण्यात आले आहे.
 अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी दोनशेहून अधिक लाडक्या बहिणीकडून आ. रमेशआप्पा कराड यांना औक्षण करण्यात येणार आहे. यासह लातूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या वतीने १ हजार नागरिकांना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे रेणापूर शहर मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्या वतीने ३ हजार शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहेत तर मुरुड मंडल अध्यक्ष सुरज शिंदे यांच्या वतीने दहा फूट उंचीच्या विविध फळांच्या शंभरहून अधिक झाडाचे निवळी ते बोरगाव रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मुरुड येथील बस स्थानक शासकीय रुग्णालय आणि समशानभूमी येथे सिमेंट बेंन्च बसवण्यात येणार असून मुरुड शहरात २५ ठिकाणी मोठ्या सिमेंट कचराकुंड्या बसवण्यात येणार आहेत. दि २८ मे रोजी पानगाव येथे तर २९ मे रोजी भादा आणि मुरुड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
        भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्त मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत विविध विधायक लोकउपयोगी उपक्रम राबवून जन्मदिवस साजरा केला जाणार आहे आ. कराड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास मतदार संघासह जिल्हाभरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्याचबरोबर हितचिंतक मित्रपरिवार यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आ. रमेशआप्पा कराड मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा, विक्रम काका शिंदे, भागवत सोट पाटील, महेंद्र गोडभरले, सतिश आंबेकर,      जे. के. कुलकर्णी, प्रताप पाटील, शरद दरेकर, सुरज शिंदे, उद्धव काळे, ॲड. मनोज कराड, अनिल भिसे, पद्माकर चिंचोलकर, ॲड, दशरथ सरवदे, रविकिरण साठे, महादेव साळुंके आणि सर्व पदाधिकारी तसेच वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने