
लातूर : 23/05/25
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बोगद्यास सतत पडत असलेल्या पवसामुळे एखाद्या नाल्याच रूप आलं होत, आज त्या मुळे नागरिकांना वाहतुकीची अडचण सहन करावी लागली असल्याने काही काळ नागरिकांमधे संतापाचे वातावरण तयार होणे साहजिकच होते.
पत्रकारांना या परिस्थिती ची माहिती मिळताच

आयुक्त पंजाबराव खानसुळे यांना हि सर्व हकीकत सांगताच त्यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाला हि माहिती दिली असता पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या टीम ने परिस्थिती ची पाहणी करून हिरीरीने कार्य करत नागरिकांना हा रस्ता लवकरात लवकर खुला करून दिला,

या पुठे असा त्रास या ठिकाणी नागरिकांना होणार नाही यासाठी योग्य त्या उपाय योजना देखील केल्या चे स्वच्छता विभागाचे अधिकारी कलीम शेख,यांनी या वेळी सांगितले आहे.

नागरिकांच्या अडचणी वेळेवर सोडवून कर्तव्य बजावल्या बद्दल मनपा प्रशासनाचे आभार