• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

शिरूर अनंतपाळ अवकाळी पावसाने तीन एकर मधील कांदा पिकाचे झालेल्या नुकसानीची आज केली पहाणी.

 शिरूर अनंतपाळ अवकाळी पावसाने तीन एकर मधील कांदा पिकाचे नुकसा : राष्ट्रवादी (श प) जिल्हाध्यक्ष संजय शेटे पाहणी करून सांगितले
लातूर:24/05/2025
शिरूर अनंतपाळ शहरातील प्रगतिशील शेतकरी राजकुमार शिवणे यांनी तीन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली होती परंतु मागील तीन, चार दिवसांपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे हाता तोंडावर आलेले कांद्याचे पिक वाहून जाऊन शेतकरी राजकुमार शिवणे यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली व तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली. 

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे प्रदेश सचिव महादेव आवाळे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे, लातूर शहर उपाध्यक्ष फारुख तांबोळी, शेतकरी राजकुमार शिवणे, निळकंठ शिवणे, धनाजी गुजे व अय्युब शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने