शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर तिरंगा रॅली काढून भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी चा कार्यक्रम घेण्यात आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे नियोजन केलेले असून सदरील तिरंगा रॅलीमध्ये सध्या भारत मातेच्या सीमेवर देशाचं संरक्षण करणारे जवान ते हजर नसतील तर त्यांचे आई वडील तसेच माजी सैनिक ,वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. होय हा देश सुरक्षित आहे ते जवानाच्या त्यागामुळे बलिदानामुळे डोळ्यात तेल घालून छातीची ढाल करून प्राण तळहातावर घेऊन लढणारे जवान आहेत म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत. पहलकांमध्ये निष्पाप 26 भारतीयांचा बळी गेला. पाकड्याने गोळ्या धर्म विचारून घातल्या याचा बदला आमच्या सैन्य दलान भारतीय सैनिकांनी आव्हान देऊन 23 मिनिटात 90 अतिरेक्याची तळ उध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लाहोर, कराची, इस्लामाबाद अशा महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानला गुडघ्यावर यायला भाग पाडलं. ते आमच्या सैन्य दलाने सैनिकांनी आणि म्हणून आम्ही निश्चित स्वरूपाने यांची ऋण फेडण्यासाठी कमीत कमी यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हे आमच आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून केलेल्या तिरंगा रॅलीच्या नियोजनामध्ये या चारी तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या सर्व जवानांना त्यांच्या मातापित्यांना ,माजी सैनिकांना, वीरमातांना, वीर पत्नींना हात जोडून नम्र विनंती करतो या रॅली दरम्यान आम्ही आपला छोटासा सन्मान करू इच्छितोय या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. यासाठी निलंगा, औसा, देवनी व शिरूर अनंतपाळ या चारही तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाखाप्रमुखांनी आपापल्या गावातील वरील सर्व लोकांना सन्मानित करण्यासाठी विनंती करावी कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचे नम्र निवेदन करावे तसेच वरील कार्यक्रमाच्या वेळी सर्व नागरिकांनी आपलं एक कर्तव्य समजून सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांच्या आई-वडिलांना तुम्ही एकटे नाहीत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित रहावे अशी नम्र विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी पत्रकारांशी बोलताना केली .
Tags
The महाराष्ट्र News