शिवसेना निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक 14जून रोजी निलंगा येथे होणार.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव सन्माननीय संजय मोरे यांच्या सूचनेवरून शिवसेनेचे उपनेते मराठवाडा संपर्क प्रमुख सन्माननीय आनंदराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा सचिव सन्माननीय अशोकराव पटवर्धन, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख सन्माननीय बालाजीराव काकडे महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख सौभाग्यवती रंजनाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लातूर जिल्ह्यातील औसा ,निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच महिला आघाडी ,युवासेना, युवती सेना, शिव सहकार सेना, राष्ट्रीय कर्मचारी सेना, अल्पसंख्यांक सेना, शेतकरी सेना ,ग्राहक कक्ष, मागासवर्गीय सेना ,ओबीसी सेना, वाहतूक सेना ,या अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की शिवसेना उपनेते मराठवाडा संपर्कप्रमुख *सन्माननीय आनंदराव जाधव साहेब* हे सदस्य नोंदणी, संघटनात्मक बांधणी, याबाबत आढावा बैठक घेणार आहेत .तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ठीक अकरा वाजता शासकीय विश्रामगृह निलंगा येथे उपस्थित रहावे ही विनंती पत्रकारांशी बोलताना शिवाजी माधवराव माने
शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी केली.
Tags
The महाराष्ट्र News