• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूरच्या पर्यावरण व पशुवैद्यकीय समस्यांबाबत डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मा. ना. पंकजाताई मुंडे यांची भेट.






आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याच्या पर्यावरण ववातावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे  यांची भेट घेत  लातूर शहर व परिसरातील पर्यावरणविषयक गंभीर समस्या आणि पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.

या भेटीत मुख्यत्वे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले त्यामध्ये मुख्यत्वे

१. लातूर MIDC वस्तीतील दूषित पाण्याचा प्रश्न:

▪️ मौजे हरंगुळ (बु.) येथील मंदार वस्ती व मौजे वरवंटी (बसवंतपूर) येथे लातूर औद्योगिक वसाहतीतून (MIDC) येणारे दूषित पाणी नाल्याद्वारे थेट वस्तीत शिरत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून जीवितास धोका निर्माण झाला आहे.
▪️ या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण अधिनियम १९८६ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊन, दूषित पाण्याच्या विल्हेवाटीसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

२. पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, लातूर - सुविधा व रिक्त पदांचा प्रश्न:

▪️ बंद असलेले IPD (Inward Patient Department) तातडीने सुरू करण्यात यावे.
▪️ लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांसाठी जून २०२३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अद्ययावत पशुरोग निदान प्रयोगशाळेचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे आणि आवश्यक निधी वितरित करण्यात यावा.
▪️ इमर्जन्सी वॉर्डची निर्मिती होऊन पशुपक्षांचे जीव वाचवण्यासाठी तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी.
▪️ इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शिपाई व खाजगी सुरक्षा कर्मचारी नेमावेत.
▪️ जिल्हास्तरावरील निवासी वैद्यकीय अधिकारी पदे तातडीने भरावीत.
▪️ थ्री-फेज कनेक्शनच्या अभावामुळे बंद असलेले सोनोग्राफी यंत्र सुरू करावे.
▪️ सध्या उपलब्ध नसलेल्या Blood Biochemistry च्या सर्व तपासण्या (LFT, KFT, इ.) दवाखान्यातच उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून खाजगी तपासणी केंद्रांवर अवलंबून राहावे लागू नये.
या विषयांवर  प्रदीर्घ चर्चा झाली त्याचप्रमाणे 
मा. मंत्री महोदयांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे असे माध्यमांशी बोलत असताना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने