• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भाजपा जिल्हा शहर अध्यक्ष अजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेऊन लातूर च्या विविध विषयांवर केली चर्चा.


भारतीय जनता पक्ष, लातूर शहर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांची प्रथमतः भेट घेतली आणि अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे विचार आणि केंद्र व राज्य सरकारचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असा शब्द त्यांना दिला. यावेळी त्यांनी आणि पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना आपली साथ आम्हाला लाभावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करताना काही मागणीपर निवेदन देण्यात आले. 

▫️ कव्हा या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल होण्यासाठी शासकीय मंजुरी मिळाली असून अद्याप संरक्षण भिंत वगळता अन्य कामे अपूर्ण आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आळा असून याबाबत आवश्यक ती ई-निविदा प्रक्रिया रेंगाळली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निर्देश देत विभागीय क्रीडा संकुलच्या कामास वेग येणे काळाची गरज बनले आहे. यामुळे येत्या काळात आपल्या लातूर जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊन लातूर ही क्रीडा मांदियाळी ठरेल.

▫️लातूर जिल्ह्यात महानगपालिकेच्या वतीने मालमत्ता कर लावलेला असून यामुळे MIDC मधील उद्योगधंद्यावर परिणाम होत आहे. लातूरच्या आधुनिक विकासाला खिळ लावणारा हा कर रद्द न झाल्यास शहरातील अनेक उद्योग बंद पडण्याचा धोका संभावतो. यामुळे जिल्ह्यातील उद्योजक वर्ग त्रस्त असून यावर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील रोजगारावर हा परिणाम होऊ नये यासाठी लातूर MIDC मधील उद्योगांना मनपाने लावलेला अन्यायकारक मालमत्ता कर रद्द करावा, जेणेकरून भूमिपुत्रांना न्याय मिळेल आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी आपल्याच जिल्ह्यात तयार होतील.

▫️लातूर शहरातील माजी पोलीस अधिक्षक श्री. सोमण मुंडे यांची बदली झाली असून अद्यापही नूतन अधिकाऱ्यांना पदभार देण्यात आलेला नाही. याचसह माजी अधिक्षक यांनीही नवीन ठिकाणी पदभार स्वीकारलेला नाही. प्रशासनाची अनास्था शहराच्या कायदा आणि सुव्यवस्था यावर विपरीत परिणाम घडवून आणू शकते. यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी नूतन पोलीस अधिक्षक यांना लवकरात लवकर पदभार सोपवण्यात यावा आणि शहराच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

यावेळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यावर कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास वाटतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने