आज दिनांक 03जून 2025 रोजी निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात लातुर जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली या बैठकीत संघटनात्मक पक्ष बांधणी,सदस्य नोंदणी, येणाऱ्या निवडणुका कस्या पद्धतीने व किती जागा लढायचं या सर्व विषयावर संघटनात्मक चर्च्या होऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पालिका या सर्व निवडणुका शिवसेना ताकतीने लढवणार.
शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचे नेतृत्व आज रोजी महाराष्ट्रात अव्वल असून या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणार या नेतृत्वाचे हात मजबूत करण्यासाठी आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवण्यासाठी कामाला लागावे असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले,
यावेळी तालुका निहाय आढावा घेण्यात आला शिवसेना तालुकाप्रमुख औसा तानाजी सुरवसे यांनी दोन जिल्हा परिषद चार पंचायत समिती कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार आणि त्यासाठी केलेली तयारी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्याकडे सादर केली तसेच औसा नगरपालिकेच्या संदर्भात प्रभाग रचनेसह तयारी झाल्याचे सांगितले त्याचप्रमाणे शिरूर आनंतपाळ देवणी निलंगा या तिन्ही तालुक्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील धनंजय बिरादार भगवान जाधव विकास शिंदे यांनी सर्व निवडणुकीमध्ये शिवसेना ताकतीनिशी निवडणूक लढवणार असे आश्वासन जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्याकडे दिले आणि आज पर्यंत केलेल्या कामाचा अहवाल आढावा रूपाने शिवाजी माने साहेब यांच्याकडे देण्यात आला यावेळी
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई बिरादार शिवसेनाउप जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, शिवसेना औसा तालुका तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे,निलंगा तालुका प्रमुख भगवान जाधव, देवणी तालुका प्रमुख धनराज बिराजदार, शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख विकास शिंदे,शिरूर आनंतपाळ महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अडवोकेट वर्षाताई शिंदे, निलंगा शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख, देवणी शहर प्रमुख यशवंत ठाकरे, युवा सेना शहर प्रमुख राहुल बिराजदार, शाखा प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News