आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पक्ष संघटन , सदस्य नोंदणी अनुषंगाने लातूर जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक शिवसेना उपनेते तथा मराठवाडा संपर्क नेते आनंदजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन ,जिल्हा प्रमुख सचिनजी दाने, महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लातूर विश्रामगृहात घेण्यात आली.यावेळी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, युवासेना,महिला आघाडी व सर्व संलग्न संघटनेची पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.शिवसेना सदस्य नोंदणी, शाखा बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी याचा आढावा घेण्यात आला.येणाऱ्या लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघातील महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुका ताकदीने लढविण्यात येतील यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे असे सांगितले. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे हाथ बळकट करण्यासाठी एकजुटीने मेहनत घेऊ असा विश्वास सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला .
बैठकीची सुरुवात अहमदाबाद येथील दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली . या निवडणुका शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे लढणार असून शिवसेना किंगमेकर च्या भूमिकेत असणार आहे. यावेळी काँग्रेस , भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पक्षप्रवेश केला, तसेच युवकांनी युवासेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला .
यावेळी शहर उपजिल्हाप्रमुख भास्कर औताडे, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, युवराज वंजारे, महानगरप्रमुख ऋषी कदम, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष विशाल देवकाते, मागासवर्गीय आघाडी जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे, महिला अध्यक्ष कल्पना बावगे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष गोडसे , उपजिल्हाध्यक्ष तुषार वैष्णव ,लातूर शहर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, रेणापूर तालुका प्रमुख कोंडिराम काळे, पॅरामेडिकल जिल्हाध्यक्ष सचिन बोडके, शहर प्रमुख दिनेश बोरा, शहर प्रमुख परवेझ पठाण, उपशहर प्रमुख पवन रणदिवे, श्रीहरी डोपे, जाधव, निलेश मांदळे, विजय कस्पटे, शुभम लोखंडे, जयश्री भुतेकर , प्रतिभा डोळसे, गाडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख धनु शिंदे, कृष्णा सरवदे, सचिव गणेश पवार, गणेश सुरवसे, विजय कांबळे, विष्णू साबदे , अँड पवन साबदे , साबणे ताई, शिवसैनिक, महिला, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजची आढावा बैठक च्या यशस्वीतेसाठी परिश्रम , कष्ट घेणाऱ्या, तसेच लातूर शहर , लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आलेल्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार .
Tags
The महाराष्ट्र News