• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे सरकार हे सन्माननीय  एकनाथराव शिंदे साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले आहे

शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर शिवाजी माने
आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे सचिव सन्माननीय य संजय मोरे , शिवसेना विभागीय नेते शिवसेनेचे उपनेते सन्माननीय आनंदराव जाधव यांच्या सूचनेवरून मराठवाडा विभागीय सचिव सन्माननीय अशोकराव पटवर्धन, लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आदरणीय बालाजीराव काकडे व महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख सौ रंजनाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. ही बैठक शिवसेनेची सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणी संघटनात्मक बांधणी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काय तयारी आहे या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनेची होत असलेली घोडदौड शिवसेनेमध्ये होत असलेले मोठ्या प्रमाणातले प्रवेश शिवसेनेचा विस्तार हा अत्यंत वेगवान असून त्याचे एकमेव श्रेय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचं आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे साहेब विराजमान झाले त्या दिवसापासून अडीच वर्षाचा जो कालखंड होता .ते अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत हे निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतलेले आहेत यामुळे शिंदे साहेबांच्या धाडसी निर्णयामुळे या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने दिलेला कौल यांचे शिलेदार आणि शिल्पकार सन्माननीय एकनाथराव शिंदे आहेत .आणि म्हणून अशा धाडसी निर्णय घेणाऱ्या कर्तुत्वान बुद्धीच्यातुर्य प्रसंगी कठोर परंतु शिवसैनिकांच्या बाबतीत अत्यंत चांगली भावना ठेवून शिवसेनाप्रमुखांचे धोरण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार उराशी बाळगून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे कार्य शिंदे साहेबांनी केलेल आहे याबाबतीत आजही आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला खूप आदर आहे. म्हणूनच शिवसेनेचे घोडदौड मोठ्या प्रमाणात होत आहे आपणही आपल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये शिवसेनेची बांधणी मजबूत करावी गटप्रमुखापासून जिल्हाप्रमुखापर्यंत सर्व नियुक्त्या गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक राबवून शिवसेना मजबूत करावी अशी आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले. यावेळी निलंगा विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी शिरूर अनंतपाळ तालुका प्रमुख विकास शिंदे ,माजी तालुकाप्रमुख भास्करराव कुलकर्णी, महिला आघाडीच्या तालुका संघटिका एडवोकेट सौ. वर्षाताई शिंदे मुरलीधर शिंदे तालुका संघटक ,शहर प्रमुख विनोद धुमाळे महिला आघाडी शहर संघटिका सुप्रियाताई सांगोले ,युवा सेना तालुकाप्रमुख धनराज माने, मनमत सुगावे शुभम शेरखाने, तूषिकांत सांगोले ,रविशंकर शिवणे ,मासूम मुकंदर पांडुरंग शिंदे असे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने