22 एप्रिल 2025 रोजी पहेलगाम येथे पर्यटकावर पाक धारजीने अतिरेकी संघटनेने केलेला गोळीबार या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की पाकिस्तान मध्ये हिम्मत नाही समोरासमोर येऊन युद्ध करून आपण जिंकूच शकत नाही हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान अतिरेकी संघटनेला हाताशी धरून भारतामध्ये वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहे. अतिरिके संघटनेला हाताशी धरून दिनांक 22 रोजी पहेलगांमध्ये आलेल्या पर्यटकाला त्यांची नावे जात धर्म विचारून गोळीबार केला. फक्त हिंदू लोकांवर गोळीबार करून ठार मारण्यात आले. यामध्ये शहीद झालेले 26 लोक निष्पाप जीव गेलेले आहेत. महाराष्ट्रातील सहा लोक मरण पावलेले आहेत. यांचा बदला निश्चित स्वरूपाने भारत सरकार भारतीय आर्मी घेतल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जवान जिवाची परा कष्टा करून भारत मातेचे संरक्षण करत आहे. परंतु षंढ प्रवृत्तीचा पाकिस्तान वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासोबत अतिरेकी कार्यवाही करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे .परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य सुधीर पाटील तालुकाप्रमुख भगवान जाधव धनराज बिरादार शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख यशवंत ठाकरे सो बघितला ताई पोरके सौ अयोध्या वैद्य का प्रभात पाटील माधव मोहिते गणेश सरतापे बबलू सरतापे खंडू काकडे सुधीर सरतापे हनुमंत काळे नवाज शेख राहुल बिराजदार रहमान आता आदित्य पाटील दादाराव धुमाळ अंकुश मोरे माधव नाईकवाडे मंगेश पाटील विक्रांत पाटील राजेंद्र मोहिते मारुती मैत्री तुकाराम माने, पिराजी भास्कर अंकुश मोरे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते