महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे यांनी शिक्षकावरील अशैक्षणिक कामाचं ओझं कमी करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय दिलेला आहे :-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूरच्या वतीने राज्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री मच्छिंद्र गुरमे सर यांच्या वतीने लातूर येथील दयानंद सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता. लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक, पुरस्कार प्राप्त करते शिक्षक, गुणवंत शिक्षक शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अशा लोकांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यातील विविध शिक्षकांना गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून शाल श्रीफळ फेटा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या गुणाचे गौरव करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण परिषदेचे विभागीय अध्यक्ष होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे ,उमरगा लोहारेचे आमदार प्रवीण स्वामी, अहमदपूरचे माजी आमदार भगवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब, डायटच्या प्राचार्य गिरी मॅडम होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना म्हणाले की राष्ट्राच्या जडणघडणीच काम हे शिक्षकाकडूनच होत असते. जन्मदात्या माता पित्याच्या नंतर लेकरांना आकार देऊन त्यांना चालना देऊन त्यांच्यातले गुण हेरून प्राविण्य ओळखून त्यांचे प्रगती करणे हे काम फक्त शिक्षकच करू शकतात .सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा चालू घडामोडी वर आधारित ज्ञान घेऊन स्वतःच्या पायावर उभं टाकणारं तंत्रज्ञान अवगत करून द्यावं आदर्श पिढी आपल्या हातून घडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि लातूर हे मूळता शैक्षणिक हब असून लातूर मधून देशात घडणारे डॉक्टर त्या पटीमध्ये 60% डॉक्टर एकट्या लातूर मधून जातात त्याच पटीने इंजिनियर सीए लातूर मधून जातात म्हणून लातूर खऱ्या अर्थाने देशातलं शैक्षणिक हब आहे .यासाठी खासदार आणि आमदार साहेब आपण दोघांनी तसा आवाज उठवावा होय मी सत्ताधारी पक्षातील जिल्हाप्रमुख आहे माझ्याच पक्षाचा राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादा भुसे साहेब आहेत .दादा भुसे साहेबांनी घेतलेला सर्वात स्तुत्य निर्णय शिक्षकांच्या बाबतीत जर कोणता असेल तर तो शिक्षकावरील शैक्षणिक कामे सोडून इतर कामे मोठ्या प्रमाणात करावी लागत होती ती सर्व कामे यापुढे शिक्षकाकडून करून घेतले जाणार नाहीत असा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला आहे. हा अत्यंत स्तुत्य निर्णय आहे .आज देशाची परिस्थिती संरक्षणाच्या बाबतीत जोखमीची आहे. होय मी एक माजी सैनिक असून या देशासाठी निश्चित पणे प्रत्येकाचे योगदान आणि बलिदान असणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून पहेलगाम निष्पाप मारले गेलेल्या बळीच्या प्रती संवेदनशील असणे अत्यंत गरजेचे आहे .आणि प्रसंग पडलातर नव्हे तर होय सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून ज्यांनी आमच्या देशावर हल्ला केला आहे भारतात नेहमीच अशांतता राहिली पाहिजे असा कट रचला आहे यासाठी या पाकड्याचं कायमचं कंबरड मोडणं गरजेचं आहे .आणि म्हणून सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या प्रती आपली सदभावना असणं त्यांना आशीर्वाद देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. ते आपण कराल अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी यावेळी व्यक्त केली .सदरील कार्यक्रमांमध्ये 200 पेक्षा अधिक लोकांना गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने गौरवण्यात आलं.
Tags
The महाराष्ट्र न्यूज