लिंगायतच्या रक्षणार्थ शिवा संघटना मैदानात शिवा संघटनाचा कसार - शिरशी, ता.निलंगा येथे पोलिस स्टेशनवर मोर्चा.
कसार - शिरशी परिसरातील बडूर गावात तरुण शिक्षक कै. गुरुलिंग अशोक हासुरे सर यांची गुंडाकडून हत्या
आरोपीना तत्काळ अटक करुण फाशी ची शिक्षा देण्याची शिवा संघटनेची मागणी कार्यवाहि मध्ये काही कसुर झाल्यास शिवा संघटना घेणार आक्रमक पवित्रा.
वृत : दिनांक : 26/4/2025 रोजी, दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गिरुलिंग हासुरे सर गेले असता. गुम्हेगारी गुंड वृतिच्या टोळक्याने, जबर मारहान केल्यामुळे गुरूलिंग सर यांचा जागीच मृत्यु झाला.
या घटनेमुळे कसार - शीरशी परिसरात गावागावात भीति चे वातवारण तयार झाले असून, सामन्य लोक भीति पोटी घराच्या बाहेर पड़त नाहीत. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुंड गिरीचे प्रमाण वाढले असून, व्यपारी, शेतकरी, नौकरदार,दूकानदार, मजूर, कामगार सर्वच जनतेमध्ये दहशतीचे वातावर तयार झाले आहे.
1998 साली कसार - शिरशी येथे शिवा संघटनेची बांधनीं प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. परिसरातील गावा - गावात शिवा संघटनेचे शेकड़ो मावळे आज सुद्धा त्याच उमेदिने सक्रिय आहेत. ही घटना आगीसारखी परिसरात पसरली. जनमानसात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. समान्य जनता पोलिस प्रशासनाकडून न्याय मिळेल या साठी अपेक्षा धरुन बसली आहे.
शिवा संघटनेच्या कसार - शीरशी तालुका कार्यकारणी ची बैठक घेऊन या अन्याच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार केला..
आज दिनांक 27/4/2025 रोजी सर्व समाज बांधवाना सोबत घेऊन कासार शीरशी च्या पोलिस स्टेशन वर प्रचंड धड़क मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारों च्या संख्येमध्ये सर्व जाती - पातीमधील समाज बांधव उपस्थित होते. या वेळी समान्य लोकामध्ये प्रचंड जनाक्रोश पहायला मिळाला, सर्वाची एकच मागणी होती की, आरोपींना तत्काळ शिक्षा झाली पहिजे.
शिवा संघटनेचे, दत्ताभाऊ खंकरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी पोलिस प्रशासनास, विनंती केली की या प्रकारणाचा तत्काळ निकाल लाउन कासार शिरशी मध्ये शांततेचे वातावरण निर्माण करावे. अन्यथा शिवा संघटना आक्रमक पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी, व पोलिस अधिक्षक कार्यालय, लातूर येथे धड़क मोर्चा व धरणे आंदोलन करु असा इशारा दिला.
या मोर्चासाठी परिसरातील गावागावतुन तरूण युवा उपस्थित होते.
या मोर्चामध्ये, शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास खिंडे,विनोदप्पा आर्य, दिलीप कत्ते, शिवा संघटना, तालुका अध्यक्ष,निलंगा ओमकार रटकलर, विश्व नाथ गबुरे, संजय गोला, मयूर गुबरे, दयानंद पाटील, मीरगाळी, तसेच औंध, बडूर, ओराद, कोराळी, ताम्बाळा, व कासार -शिरीशी पंचक्रोशीतील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
Tags
The महाराष्ट्र News